Published On : Tue, Nov 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर-सावनेर महामार्गावर इंदौर-हैदराबाद वॉल्वो ट्रॅव्हल्स पलटल्याने; सहा प्रवासी जखमी!

Advertisement

Six Injured as Volvo Bus Overturns Near Saoner

नागपूर -जिल्ह्यातील सावनेर परिसरात मंगळवारी पहाटे इंदौरहून हैदराबादकडे जाणारी इंटरसिटी कंपनीची वॉल्वो ट्रॅव्हल्स उलटली. केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील NH-47 वरील जैतपूर-सावली फाट्याजवळ हा अपघात घडला. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये एकूण २९ प्रवासी होते. मंगळवारी पहाटे सुमारे २.१० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना केळवद पोलिसांच्या मदतीने खासगी रुग्णवाहिकेतून सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातात सुरक्षित बचावलेल्या इतर प्रवाशांना दुसऱ्या हंस ट्रॅव्हल्समधून हैदराबादला रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच केळवद पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक आशिष सिंह ठाकूर, महामार्ग पोलीस एपीआय श्रीकांत कोळी यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि हितज्योती आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी मदतकार्य केले. दरम्यान, अपघाताच्या कारणांचा पुढील तपास केळवद पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.