Published On : Thu, Aug 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विमानतळावर पायलटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Advertisement

नागपूर:नागपूर विमानतळावर इंडिगो विमानाच्या पायलटचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पायलट नागपूरहून पुण्याला उड्डाण घेण्याच्या तयारीत होता. त्यापूर्वीच बोर्डिंग गेटजवळ पायलटला हृदयविकाराचा झटका येऊन तो जमिनीवर पडला. ग्राउंड स्टाफच्या मदतीने विमानतळावर पायलटला रुग्णालयात नेण्यात आले.तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Gold Rate
Apr 132026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,40,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मृत्युमुखी पडलेल्या पायलटचे नाव कॅप्टन मनोज सुब्रमण्यम असून, त्यांचे वय ४० वर्षे आहे.मृत्यूचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पायलट मनोजचे नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement