Published On : Tue, Apr 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

इंडिगो मुंबई-नागपूर फ्लाइटचा लँडिंग करताना मागचा भाग धडकला ; जीवितहानी नाही

Advertisement

नागपूर : इंडिगो मुंबई-नागपूर फ्लाइट 6E-203 चे 14 एप्रिल रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर लँडिंग करत असताना मागचा भाग धडकल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.

14 एप्रिल 2023 रोजी, मुंबईहून नागपूरला जाणार्‍या फ्लाइट 6E 203 ला लँडिंग करताना टेल स्ट्राइक (मागील भाग धडकेने ) झाला. यादरम्यान विमानाला नागपूर विमानतळावर मूल्यांकन आणि दुरुस्तीसाठी ग्राउंड घोषित करण्यात आले. घटनेची सविस्तर चौकशी केली जात असल्याची माहिती इंडिगोने आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

टेक ऑफ किंवा लँडिंग दरम्यान जेव्हा विमानाचा मागील भाग किंवा एम्पेनेज जमिनीवर किंवा अन्य स्थिर वस्तूवर आदळते तेव्हा टेल स्ट्राइक होतो.जानेवारी 2023 मध्ये इंडिगोच्या आणखी एका फ्लाइटला टेल स्ट्राइकचा सामना करावा लागला, ज्यामुळे विमानाचे सुरक्षितपने लँडिंग झाले.

टेल स्ट्राइक होणे ही सहसा दुर्मिळ घटना असते आणि काळजीपूर्वक हाताळले नाही तर अप्रिय घटना घडू शकते. त्यामुळे पायलटला खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

Advertisement
Advertisement