Published On : Thu, Nov 29th, 2018

चार शहरांसाठी आज इंडिगोची विमानसेवा रद्द

File Pic

नागपूर : इंडिगो एअर लाईन्सची नागपूरहून कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली व कोच्ची या चार शहरांसाठी असलेली विमान उड्डाण सेवा गुरुवारी बंद राहील. काही दिवसांपूर्वीच ही सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती.

इंडिगोची ६ ई ६६३, ६६४ कोलकाता-नागपूर-कोलकाता, ६ ई ८१६, ८१७ कोच्ची-नागपूर-कोच्ची, ६ ई ६३६ दिल्ली-नागपूर-दिल्ली व ६ ई- ३५६ बंगळुरू- नागपूर- बंगळुरू उड्डाणसेवा रद्द करण्यात आली आहे.

उड्डाण रद्द करण्यामागे संचलनाचे कारण सांगितले जात असून प्रवाशांना याची माहिती कळविण्यात आल्याचाही दावा केला जात आहे. रद्द करण्यात आलेल्या तिकिट बुकिंगचे पैसेही प्रवाशांना परत करण्यात आले आहेत.

सिस्टमवर या फ्लाईटची बुकिंगही थांबविण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह इतर काही शहरात धुक्यांमुळे विमानसेवा प्रभावित होऊ शकते. सकाळी व रात्रीच्या उड्डाणांना धुक्यामुळे अडचण होत आहे.