Published On : Fri, Nov 1st, 2019

इंटरनेटच्‍या जागतिकीकरणात व्हिडीओ मानकीकरण महत्‍वाचे -श्री.आर.पी.मिश्रा प्रमुख भारतीय मानक ब्‍यूरो नागपूर यांचे प्रतिपादन

नागपूर: ओटीटी प्‍लॅटफॉर्म, टि.व्हि., यूट्यूब, याच्‍या माध्‍यमांतून व्हिडीओ माध्यम आपल्‍या जीवनाचा अविभाज्‍य घटक बनले आहे. स्‍मार्टफोन, व्हिडीओ कॅमेरामूळे डीजीटल स्‍पेसमध्‍ये परस्‍पर चर्चांना वाव मिळत आहे. व्हिडीओ मार्केटिंग व्लॉगींग, लाईव्‍ह व्हिडोओज् यांच्‍या माध्‍यमातून जागतिक पातळीवर 90 टक्‍के इंटरनेट ट्रॅफिक संचालित होते. व्हिडोओ मानकीकरण या इंटरनेटच्या जागतिकीरणात त्यासाठी महत्वाचे ठरते.

भारतीय मानक ब्‍यूरो(ब्‍युरो ऑफ इंडियन स्‍टॅडर्स-बी.एस.आय.) तसेच आई.ई.सी.(इंटरनॅशनल इलेक्ट्रोकम्‍युनिकेशन कमिशन), आय.एस.ओ. (इंटरनॅशनल स्‍टॅडंर्ड ऑर्गनायजेशन) यांच्‍या संयुक्‍त विद्माने व्हिडीओचे मानकीकरण विविध तांत्रिक समित्‍याच्‍या माध्‍यमातून होत असल्‍याच बी.एस.आय.नागपूरचे प्रमुख आर.पी.मिश्रा डॉ. मिश्रा यांनी सांगितले. केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्‍या अंतर्गत नागपूर येथील भारतीय मानक ब्‍यूरोच्‍या वतीने ‘विश्‍व मानक दिवस’ आज स्थानिक हॉटेल सेंटर पॉंईट येथे साजरा करण्‍यात आला.

याप्रसंगी ‘वीडीओ मानक एक वैश्विक मंचाचे निर्माण’ या विश्‍व मानक दिवसाच्या संकल्‍पनेवर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्यावेळी मिश्रा बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथि म्‍हणून व्ही.एन.आय.टी. नागपूरचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स व कम्‍युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे डॉ.ए.एस.गांधी उपस्थित होते.

दूरसंचार क्षेत्रात पूर्वी 1जी तंत्रज्ञान असतांना एका देशात विशिष्‍ट भ्रमणध्‍वनी सेवा वापरता येत होती. पण, कालांतराने 4 जी पर्यंत तंत्रज्ञान विकसित झाल्‍याने भ्रमणध्‍वनी सेवा सार्वत्रिक झाली. थ्रीजीपीपी(थर्ड जनरेशन पार्टनरशीप प्रोजेक्‍ट) द्वारे उद्योग व आंतरराष्‍ट्रीय मानकीकरण संस्‍था आता एकत्रितरित्‍या 5 जी तंत्रज्ञानासोबत 6 जी तंत्रज्ञानावर ही कार्य करत आहेत, अशी माहि‍ती व्ही.एन.आय.टी.चे डॉ. गांधी यांनी दिली.

उद्घाटकीय सत्रानंतर झालेल्‍या तांत्रिक सत्रात मार्गदर्शन करतांना निरीच्‍या विश्‍लेषणात्‍मक विभागाच्‍या वरिष्‍ठ वैज्ञानिक श्रीमती पूनम प्रसाद यांनी ‘व्हिडीओ मानकीकरण’ यावर एक सादरीकरण केले. व्हिडीओचा आकार कमी करण्‍यासाठी व त्‍यांची साठवण क्षमता व बँडविथ कमी करण्‍यासाठी व्हिडीओ मानकांची उपयुक्‍तता त्‍यांनीयावेळी स्पष्ट केली. केबल वाहिन्‍या, सेट टॉप बॉक्‍स, डी.टी.एच., इंटरनेट प्रोटोकॉल टी.व्‍ही.

याद्वारे मानकांची पूर्तता याबद्दलही त्‍यांनी माहितीपूर्ण विवेचन केले. व्ही.एन.आय.टी. नागपूरचे सहायक प्राध्‍यापक डॉ. सौगाता सिन्‍हा, हिंडाल्‍को इंडस्‍ट्रीज नागपूरचे मृत्‍यूंजय पांडे, व बी.एस.आय.नागपूरचे विजय नितनवरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास बी.एस.आय.नागपूर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपास्थित होते.