Published On : Wed, Sep 27th, 2017

म्यानमार बॉर्डरवर भारतीय लष्काराची मोठी कारवाई, बंडखोरांचा तळ उद्धवस्त, अनेक ठार

Advertisement


नवी दिल्ली: भारतीय लष्कराने बुधवारी म्यानमारमध्ये बंडखोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड NSCN(K) या बंडखोर संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे. आर्मीचे म्हणणे आहे, की भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत नागा बंडखोरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे अनेक तळही उद्धवस्त करण्यात आले आहे. या कारवाईत भारताचे काहीही नुकसान झाल्याची माहिती नाही. याआधी भारताने जून 2015 मध्ये म्यानमारमध्ये घुसून अशीच कारवाई केली होती.

केव्हा झाली कारवाई ?
आर्मीच्या इस्टर्न कामांडने म्हटल्यानुसार, बंडखोरांविरोधात बुधवारी पहाटे 4.45 वाजता कारवाई करण्यात आली. बंडखोरांनी जवानांवर ओपन फायरिंग केली होती. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईक अनेक बंडखोर मारले गेले.

कुठे झाली कारवाई ?
आर्मीने म्हटले आहे, की आसाम-नागालँड सीमेजवळ ही कारवाई झाली आहे. नागा बंडखोरांनी लंगखू गावाजवळ हल्ला केला होता. हा भाग भारत – म्यानमार सीमेजवळून 15 किलोमीटर अंतरावर आहे.

कोण होते लक्ष्य ?
NSCN(K)या बंडखोरांच्या संघटनेचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहे. यांचे अनेक बंडखोर मारले गेल्याची माहिती आहे.
भारतीय सैन्याने सीमेपार जाऊन हल्ला केला?
आर्मीच्या इस्टर्न कमांडच्या माहितीनुसार, भारतीय जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेपार (इंडो-म्यानमार बॉर्डर) जाऊन हल्ला केला नाही. फक्त बंडखोरांच्या हल्ल्याला तोडीसतोड उत्तर दिले आहे. या कारवाईत भारतीय लष्कराचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

याला सर्जिकल स्ट्राइक म्हणता येईल?
आर्मीने याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. सुरुवातीला माध्यामांमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या बातम्या येत होत्या, मात्र भारतीय आर्मीने स्पष्ट केले की ही कारवाई सर्जिकल स्ट्राइक नव्हते.

दोन वर्षांपर्वी का झाले होते सर्जिकल स्ट्राइक?
बंडखोरांनी जून 2015 मध्ये मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात बीएसएफच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात भारतीय सैन्याचे 28 जवान शहीद झाले होते. त्यानंतर इंडियन आर्मीने दुसऱ्या देशात (म्यानमार) जाऊन 100 बंडखोरांना कंठस्नान घातले होते.
म्यानमार ऑपरेशनसाठी भारतीय सैन्याने पाच दिवसांची तयारी केली होती. त्यानंतर पॅरा कमांडोंनी सीमा ओलांडून बंडखोरांचे दोन तळ उद्धवस्त केले होते. यात जवळपास 100 बंडखोरांना मारण्यात आले होते.
भारतीय आर्मीने अशा प्रकारे म्यानमारमध्ये केलेली ही पहिली कारवाई होती. आर्मीच्या एलीट पॅर कमांडोंनी ही कारवाई केली होती. अशी माहिती आहे, की जवळपास 25-30 कमांडो हेलिकॉप्टरने म्यानमारच्या जंगलात उतरले. त्यांनी बंडखोरांच्या कॅम्पवर हल्ला केला.
अशा कारवाईची माहिती प्रथमच एका महिला आर्मी ऑफिसरने मीडियाला दिली होती. मेजर रुचिका शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सर्जिकल स्ट्राइकबद्दल सांगितले होते.

45 वर्षात भारतीय सैन्याने सीमार केले 6 ऑपरेशन
– 1971: आपले सैन्या बांगलादेशात घुसले होते.
– 1987: 50 हजार जवान श्रीलंकेच्या जाफना मध्ये तैनात.
– 1988: 1400 कमांडो मालदीव मध्ये पाठवले.
– 1995: बंडखोरांविरोधात म्यानमारमध्ये ऑपरेशन.
– 2015: म्यानमार सीमापार करुन दुसऱ्यांदा कारवाई.
– 2016: PoK मध्ये सर्जिकल स्ट्राइक.