Published On : Mon, May 8th, 2017

वायू सेनेची आजपासून भरती, बारावी पास तरुणांना संधी

Indian Air Force

File Pic


सांगली:
वायूसेना सुरक्षा सेवा आणि वैद्यकीय सहायक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. भारतीय वायू सेनेतील पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला आजपासून तासगावमध्ये सुरुवात झाली आहे. या पदांसाठी बारावी पास ही पात्रता अट आहे. तासगावातील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळा इथं ही भरती प्रक्रिया होत आहे.

8 मे आणि 10 मे या कालावधीत ही प्रक्रिया होईल. या मेळाव्यामध्ये शारीरिक आणि लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसहित उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यांची जन्म दिनांक 07 जुलै 1997 ते 20 डिसेंबर 2000 या दरम्यान असावी. गेल्या वर्षी जून महिन्यात सांगली शिक्षण संस्था आणि भारतीय वायू सेना यांच्या वतीने, भारतीय वायू सेनेतील नोकरीच्या संधींबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं.

कोणत्या पदांसाठी भरती?
वायूसेना सुरक्षा सेवा – एअरमन – ग्रुप Y (नॉन टेक्निकल) – इंडियन एअरफोर्स सिक्युरिटी
वैद्यकीय सहायक – मेडिकल असिस्टंट ग्रुप Y (नॉन टेक्निकल)

Advertisement

शैक्षणिक पात्रता
पहिल्या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून 50 टक्के गुणांसह बारावी पास असावा. वैद्यकीय सहायक पदासाठी – उमेदवार विज्ञान शाखेतून 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. यामध्ये फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांचा समावेश असावा.

वयाची मर्यादा
इच्छुक उमेदवारांचा जन्म दिनांक 07 जुलै 1997 ते 20 डिसेंबर 2000 या दरम्यान असावी.

भरतीविषयी माहिती
8 ते 9 मे – ग्रुप Y IAF (S) ट्रेड – लेखी परीक्षा, अॅडॅप्टॅबिलीटी टेस्ट, शारिरीक चाचणी
10 ते 11 मे 2017 – ग्रुप Y वैद्यकीय सहाय्यक – लेखी परिक्षा, अॅडॅप्टॅबिलीटी टेस्ट, शारिरीक चाचणी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement