Advertisement
नागपूर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या अंतर्गत या मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.
सुमारे दीड वर्षानंतर व्हीसीएमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार असल्याने शहरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 9 आणि 12 फेब्रुवारीला कटक आणि अहमदाबाद येथे होणार आहे.
दरम्यान नागपुरात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022 मध्ये VCA येथे खेळला गेला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला.