नागपूर : महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज आज 1 ऑक्टोबर रोजी गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये 94 रुपयांची वाढ झालेली आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 1900 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नई आणि कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 48 रुपयांची वाढ करण्यात आली. चेन्नईमध्ये आता व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1903 रुपये तर कोलकाता शहरात सिलिंडरची किंमत 1850.50 रुपयांवर पोहोचली आहे.
मुंबईतही गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत.मुंबई व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 48.5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत गॅस सिलिंडर 1692.50 रुपयांवर पोहोचले आहे. तर नागपुरातही जवळपास तेच दर आहेत.
दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मार्च महिन्यापासून कोणताही बदल झालेला नाही.