Published On : Sun, Aug 29th, 2021

‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’च्या वेबसाईटचे उद्घाटन


नागपूर: ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ या संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- आर्किटेक्चर यांची देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका आहे.

खूप रोजगार निर्मिती करणारे हे क्षेत्र असून बांधकामाचा खर्च कमी कसा करता येईल, यासाठी आर्किटेक्चर यांनी प्रयत्न करावे. तसेच स्टील आणि सिमेंटला पर्याय म्हणून अन्य वस्तूंचा वापर बांधकामात कसा करता येईल, याचा विचारही करण्यात यावा.

विविध क्षेत्रात आर्किटेक्चर्स यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नकाशांना मंजुरी मिळण्याचे आव्हान या व्यावसायिकांसमोर आहे. यावरही नवीन पध्दतीचा अवलंब कसा करता येईल, याचा अभ्यास व्हावा, असेही ना. गडकरी म्हणाले.