Published On : Sat, May 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील शासकीय दंत रुग्णालयात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरसह सिम्युलेशन लॅबचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन!

Advertisement

नागपूर– शासकीय दंत रुग्णालय, नागपूर येथे नवीन उच्च तंत्रज्ञान असलेल्या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर (OT) आणि देशातील पहिल्या सिम्युलेशन लॅबचे भव्य उद्घाटन आज पार पडले. या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आशीष जयसवाल (राज्यमंत्री, वित्त, निधी मदत व पुनर्वसन तथा कृषी) यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात डॉ. राज गजभिये (विभागीय संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन), डॉ. अभय दातारकर (अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय), डॉ. प्रशांत पंदिलवार, डॉ. वर्षा मानेकर, डॉ. मंगेश फडनाईक, डॉ. धीरज कालरा तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gold Rate
Aug 11 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,800 /-
Gold 22 KT ₹ 1,42,700 /-
Silver/Kg ₹ 2,37,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ऑपरेशन थिएटरची वैशिष्ट्ये-
नवीन मॉड्युलर OT ही WHO व NABH मानकांनुसार डिझाइन केलेली असून, यामध्ये आधुनिक HEPA फिल्टर्स, लॅमिनार एअर फ्लो प्रणालींचा समावेश आहे. यामुळे OT मध्ये जीवाणू आणि धुळीचे प्रमाण अत्यंत कमी ठेवले जाते. OT च्या गुळगुळीत आणि अँटी-बॅक्टेरियल पृष्ठभागांमुळे साफसफाई आणि निर्जंतुकीकरण अधिक सुलभ झाले आहे.

या प्री-फॅब्रिकेटेड OT ची रचना जलद उभारणीसाठी उपयुक्त असून भविष्यातील अद्ययावत बदलांकरिता लवचिकता देखील प्रदान करते. ऊर्जा कार्यक्षमतेसह देखभाल आणि दुरुस्तीही अधिक सुलभ झाल्यामुळे ही प्रणाली अधिक टिकाऊ व परिणामकारक ठरते.

Advertisement

सिम्युलेशन लॅब – विद्यार्थ्यांसाठी क्रांतिकारी पाऊल-
देशातील पहिली आणि अत्याधुनिक सिम्युलेशन लॅब शासकीय दंत रुग्णालयात स्थापन झाली असून, ती विद्यार्थ्यांसाठी एक वरदान ठरत आहे. या लॅबमध्ये तीन सिम्युलेशन खुर्च्यांची स्थापना करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व आधुनिक दंतशास्त्रीय कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

लॅबमध्ये थ्रीडी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टायपोडॉन्ट दातांवर विविध प्रक्रिया शिकवण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, नियंत्रित आणि वास्तवदर्शी वातावरणात प्रशिक्षण मिळणार आहे, ज्यातून त्यांच्या व्यावसायिक क्षमतांचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे.

शासकीय दंत रुग्णालयातील या उपक्रमामुळे नागपूर शहरात आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला असून, याचा लाभ रुग्णांबरोबरच भविष्यातील डॉक्टर आणि दंततज्ज्ञांना देखील होणार आहे.

Advertisement
Nagpur Crime: पुराने विवाद में युवक पर हमला #NagpurNews #Crime  #MaharashtraNews #news #newsupdate

Nagpur Crime: पुराने विवाद में युवक पर हमला #NagpurNews #Crime #MaharashtraNews #news...

पुलिस के खौफ में आरोपी ने खाया जहर? इलाज के दौरान मौत #NagpurNews  #Crime #PoliceNews #FraudCase

पुलिस के खौफ में आरोपी ने खाया जहर? इलाज के दौरान मौत...

72 वर्षीय बुजुर्ग महिला से 55 हजार का मंगलसूत्र झपटा #crimenews #nagpurnews #vidarbhanews

72 वर्षीय बुजुर्ग महिला से 55 हजार का मंगलसूत्र झपटा #crimenews #nagpurnews...

पृथ्वीराज चव्हाण का बड़ा बयान! BJP पर निशाना #NagpurNews #Politics #MaharashtraNews #Congress #BJP

पृथ्वीराज चव्हाण का बड़ा बयान! BJP पर निशाना #NagpurNews #Politics #MaharashtraNews #Congress...

Job के नाम पर ₹25 लाख का खेल! #NagpurNews #Crime #jobfraud  #JobScam #Fraud #ConsultancyFraud

Job के नाम पर ₹25 लाख का खेल! #NagpurNews #Crime #jobfraud #JobScam...

सहकर्मी पर भरोसा पड़ा भारी! #NagpurNews #Crime #BankFraud #LoanFraud #LoanScam #BankEmployee

सहकर्मी पर भरोसा पड़ा भारी! #NagpurNews #Crime #BankFraud #LoanFraud #LoanScam #BankEmployee

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges