Published On : Tue, Aug 9th, 2022

दवलामेटीत करोडो रुपयांची पाणी पुरोठा योजने चे शुभारंभ.

Advertisement

आमदार निधीतून रस्ता व समाज भवन सौंदर्य करणाचे पण भूमिपूजन.

नागपुर – महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, जलव्यवस्थापन विभाग, नागपूर. जल जिवन मिशन कार्यक्रमांतर्गत रू १२९२.२२ लक्ष योजने चे भूमिपूजन ६ ऑगस्ट ला करण्यात आले.

दवलामेटी ग्रामपंचायत चा सरपंच रीता उमरेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दवलामेटी गावाला महाराष्ट्र जिवन प्राधिकरण मार्फत वेणा पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येते. गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने ७० ली./मानसी दराने ही योजना जल जिवन मिशन अंतर्गत तयार करण्यात आली आहे. सदर योजनेस मुख्य अभियंता मजीप्रा प्रादेशिक विभाग नागपूर यांनी २३.११.२०२१ चा पत्र अन्वये रू १२९२.२२ लक्ष चा योजनेस तांत्रिक मान्यता दिली आहे. तसेच १७.१२.२०२१ ला या योजनेस प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.

त्या अनुसंगाने आज भूमिपूजन करण्यात आले. तसेच रस्ता व समाज भवन सौंदर्य करण आमदार समीर मेघे यांच्या निधीतून मण्य झाले व त्यांचे पण भूमिपूजन करण्यातआले.

आमदार समिरजी मेघे यांचा शूभ हसते भूमिपूजन तर जील्हा परीषद सदस्या ममता ताई धोपटे , पंचायत समिती सदस्या सुलोचना ताई ढोके, तसेच माजी पंचायत समिती सदस्य सुजित भाऊ नितनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन दवलामेटी ग्राम पंचायत सरपंच रीता ताई उमरेडकर तसेच उप सरपंच प्रशांत भाऊ केवटे व सर्व सदस्यगण यांनी केले.

या वेळीं ग्रामपंचायत सदस्य सिध्दार्थ ढोके, गजानन जी रामेकर, सिध्दार्थ खोब्रागडे, तंटा मुक्ति अध्यक्ष प्रकाश मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य साधना शेंद्रे, रक्षा सुखदेवे, अर्चना चौधरी, रश्मी पाटिल, शकुंतला अभ्यंकर, शीतल वानखेडे, उज्वला गजभिये, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद केवटे, रोहित राऊत, संजय कपणीचोर, नाजूकराव अभ्यंकर, वामन वाहने, संदेश गवई, मिथुन गवई, छत्रपती शेंद्रे, नरेंद्र नितनवरे तसेच मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते व गावातील नागरीक उपस्थित होते.