Published On : Sat, Apr 21st, 2018

मनपाच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्‌घाटन

Summer Camp

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे मनपाच्या शाळेत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्‌घाटन क्रीडा समिती नागेश सहारे यांच्या हस्ते शुक्रवार (ता.२०) ला मनपाच्या एम.के.आझाद हायस्कुल येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, प्रसिद्ध कलाकार नाना मिसाळ, माने, शाळेच्या प्राचार्या निखत रेहाना उपस्थित होत्या.

नागपूर महानगरपालिकेद्वारे २० एप्रिल ते ५ मे या दरम्यान उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिरामध्ये हॉकी, फुटबॉल, मैदानी स्पर्धा सोबतच चित्रकला, क्राफ्ट, संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. मनपाच्या शाळांसह अन्य शाळेचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात असल्याची माहिती नागेश सहारे यांनी दिली.

Advertisement

यावेळी बोलताना नागेश सहारे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होऊन स्वत:चा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले.

Advertisement

शाळा परिसरातील शाळेचे विद्यार्थी सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाला निझाम, खांडेकर, मुजीब,  गौर,  शाहू यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन नरेश सवाईथूल यांनी केले. आभार रवि धर्मे यांनी मानले.

Summer Camp

Summer Camp

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement