नागपूर : शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल नगर, प्रियंकावाडी, हिंदुस्तान कॉलनी, गजानन नगर आणि समर्थ नगर या परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राहुल नगर पोलीस चौकी आज औपचारिकपणे कार्यान्वित करण्यात आली.
या चौकीचे उद्घाटन दुपारी १२:३० वाजता मा. श्री राहुल मदने (पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ०२) आणि मा. श्री सुधीर नंदनवार (सहाय्यक पोलीस आयुक्त, सिताबर्डी विभाग) यांच्या हस्ते गजानन नगर बीटमधील चौकी परिसरात पार पडले.
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे, धंतोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पोलीस चौकीच्या स्थापनेमुळे परिसरातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवणे, स्थानिक गुन्हेगारीला पायबंद घालणे आणि नागरिकांना अधिक तत्पर व प्रभावी पोलीस सेवा पुरवणे शक्य होणार आहे. ही चौकी केवळ कायदा-सुव्यवस्थेसाठी नव्हे, तर नागरिकांशी अधिक जवळचा संपर्क साधण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.










