Published On : Sat, Oct 27th, 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेस वराडा शाखेचे उद्घाटन

नवनिर्वाचित सरपंच व सदस्याचा सत्कार.

कन्हान : – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वराडा वराडा शाखेचे उद्घाटन व नवनिर्वाचित सरपंच व सदस्याचा सत्कार सोहळा नुकताच वराडा येथे संपन्न झाला . गुरुवार (दि.२५) ला सायंकाळी ७ वाजता राष्ट्रवादी काॅगेस पक्ष वराडा शाखा चे उदघाटन मा.नवनियुकत जिल्हाअध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या हस्ते व विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे यांचे अध्यक्षेत तालुका अध्यक्ष गणेश पानतावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वराङा शाखा चे उदघाटन करण्यात आले .

Advertisement

तसेच नुकतीच ग्राम पंचायत निवडणूकीत निवडून आलेले बनपूरी, केरडी, वराडा चे सरपंच व सदस्य याचा शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी राष्ट्रवादी काॅगेस पक्षात ५० युवक, महिलानी प्रवेश घेतला. जिल्हा अध्यक्ष तसेच विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे यांनी पक्षाची भूूमिके विषयी मार्गदर्शन करून भाजपा च्या सत्तेत शेतकरी, कामगार, व्यापारी व सर्व सामान्य जनतेला मोठे नुकसान झाले असुन त्रास सहन करावा लागला आहे .

यास्तव भाजप ला हद्दपार करून सर्व सामान्य जनतेच्या हिताचे सरकार सत्तेत आणण्याचे आवाहन करण्यात आले . कार्यक्रमास सुधाकर जामदार, रामाजी ऊके, दिवाकर जामदार , नितीन हेटे, मंगेश ठाकरे , राजु मडावी , अनिल सय्याम, विजय घाटोळे , संजय टाले, विनोद नेवारे , गजानन जामदार, रमेश बागाईतकार, धनराज राऊत, कवडु शेळकी, अशोक नागपुरे सह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थितीत होते .

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement