Published On : Thu, Apr 20th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या नवीन नागरी आरोग्य वर्धिणी केंद्राचे लोकार्पण

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तसेच नवनिर्माण मांगगारोडी समाज बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने हनुमान नगर झोन येथील राहाटे टोली (रामटेके नगर) येथे नवीन नागरी आरोग्य वर्धिणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांच्या हस्ते या केंद्राचे बुधवार (ता. १९) रोजी लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बकुल पांडे, हनुमान नगर झोनचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संस्थापिका श्रीमती लीना बुधे, नवनिर्माण मांगगारोडी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. मंगल अण्णाजी लोंढे, उपाध्यक्ष श्री नितीन जयसिंग नाडे,श्री. रुपेश लोंढे, श्री. बळीराम उफाडे, श्री. नीरज शेंडे, श्री. गंगाराम मानकर, श्री दिनेश मानकर, श्री. बन्सी मानकर, श्री. कैलास लोंढे, श्री. सुजित लोंढे, कुंदन शेंडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Gold Rate
Apr 21 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,800 /-
Gold 22 KT ₹ 1,43,000 /-
Silver/Kg ₹ 2,53,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाच्या हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या राहाटे टोली (रामटेके नगर) येथील या नवीन नागरी आरोग्य वर्धिणी केंद्रात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. यात माता बाल संगोपन, गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी, बालकांचे लसीकरण, गर्भनिरोधक वितरण, कुटुंब नियोजन समुपदेशन, आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement