भंडारा: पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते उद्या दि. 26 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयात बहुद्देशीय पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अतिरीक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती उपस्थित राहणार आहेत.
पोलीस अधिकारी,अंमलदार, तसेच पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. पालकमंत्री दौऱ्यातील तपशीलानुसार उद्या सकाळी मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यावर सकाळी 10.10 वाजता या केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
प्रशिक्षण केंद्रामध्ये 300 चौरस फुटाचा भव्य हॉल उभारण्यात आला आहे. 300 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊ शकतील. टेबल, खुर्च्या, माईक, वातानुकुलीन यंत्र, पुरूष व महिलासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रोजेक्टर सुविधा या सुविधा आहेत.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
तलाक के बाद शादी से मुकरा प्रेमी.. #nagpurnews #crime #latestnews
भरतवाड़ा में युवक की चाकू गोदकर हत्या.. #nagpurnews #crime #murdernews
महाविकास आघाड़ी ने भाजपा पर साधा निशाना #nagpurnews #MVA #Congress #PoliticalNews
रवि भवन के सामने ओला ड्राइवर का शव बरामद.. #nagpurnews #oladriver #death
सरेआम चाकू की नोक पर डिलीवरी बॉय से लूट.. #nagpurnews #crime #newsupdate








