Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Nov 18th, 2017

  हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सवाचे थाटात उद्घाटन

  Hon CM at Hadas Highschool Nagpur Amrut Mahotsav prog-1
  नागपूर: हडस हायस्कूल हे नागपूरचे वैभव आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुरुप युवाशक्ती निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे आव्हान स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.लिबरल एज्यूकेशन सोसायटीच्या हडस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा अमृत महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले,त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. तर सुप्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर,पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लिबरल एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष पी.व्ही.खांदेकर, सचिव डॉ.ए.पी.जोशी,व्ही.बी.सपळे, के.बी.जोशी, हडस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता कुंडले, ज्योती बेंदरे, प्राजक्ता शुक्ला, के.व्ही.जोशी, श्रीमती दिपा फडके व श्रीमती कल्याणी शास्त्री आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

  डिजिटललायझेशनच्या काळामध्ये राज्यातील विशेषत:जिल्हा परिषदेच्या 62 हजार शाळा डिजिटलायझेशन करुन प्रगत झाल्या आहेत.मागील तीन वर्षात शिक्षण क्षेत्रात केलेल्या व्यवस्थेमुळे 18 व्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर प्रगती केली आहे. उत्तम शिक्षण दिले तर परिवर्तन घडू शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.हडस संस्थेतर्फे निर्माण होत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सामान्य शिक्षक हे हडस प्रायमरी स्कूलचे संस्थापक होते. हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. व्यावसायिकतेच्या दृष्टीकोनातून या शाळेची निर्मिती झाली नसून त्यामागे शिक्षणाची तसेच त्यागाची भावना आहे. आज स्पर्धेचे युग आहे. यात टिकून राहायचे असेल तर काळानुरुप परिवर्तन होणे आवश्यक आहे. नागपूरातील उद्योगांना सक्षम मनुष्यबळ पुरविण्यासाठी शिक्षण संस्थांनी उत्तम कौशल्ययुक्त विद्यार्थी तयार केले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षणसंस्थांनी पुढाकार घ्यावा.प्रास्ताविक करतांना संस्थेचे सचिव डॉ.ए.पी.जोशी यांनी आजवर संस्थेच्या प्रगतीचा आढावा नमूद केला.शाळेच्या प्रगतीचा आलेख दाखविणारा माहितीपट दाखविण्यात आला.‘अमृत गाथा’ स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145