Published On : Mon, Dec 24th, 2018

बाल संस्कार धम्म वर्गाचे उदघाटन

Advertisement

कन्हान : – रमाई सार्वजनिक वाचनालय गणेश नगर कन्हान येथे बाल संस्कार धम्म वर्गा (संडे स्कुल ) चे उदघाटन करण्यात आले रविवार (दि.२३) ला सकाळी १० वाजता भदंत नागवंश यांच्या हस्ते व मार्गदर्शक आयु मोनिय धमगाये , प्रा. ललीत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रमाई सार्वजनिक वाचनालय गणेश नगर कन्हान येथे बाल संस्कार धम्म वर्गाचे उदघाटन करण्यात आले.

छोटय़ा बालकांच्या मनावर नैतिक शिकवणुकी च्या माध्यमातून सुसंस्कार व्हावेत व त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास साधला जावा या संकल्पनेतुन आयोजक सखाराम मंडपे यांनी दर रविवारी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ८ वर्षाच्या वरील मुलांन करिता संडे स्कुल म्हणजे बाल संस्कार धम्म वर्गाची सुरूवात करण्यात आली आहे .

या कार्यक्रमास इंजि.अश्वमेध पाटील व प्रिया राऊत यांनी उत्सुर्फतेने सहकार्य केले . उदघाटनास शशिकला बागडे , पिंकीताई मेश्राम, दुर्गा निकोसे , अन्नपुर्णाबाई गजभिये , फोकसे सर, अनिल डोंगरे, अ़खिलेश मेश्राम सह छोटे बालक उपस्थित होते .