Published On : Mon, Aug 5th, 2019

नरसाळा आरोग्य शिबिरात 2829 रुग्णांची तपासणी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

नागपूर: श्री श्री फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या आरोग्य शिबिरांच्या मालिकेत आज नरसाळा येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 2829 रुग्णांची नि:शुल्क तपासणी करून आवश्यक त्या रुग्णांना औषधोपचार करण्यात आले.

Advertisement

या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे, जि.प. सदस्य शुभांगी गायधने, श्री श्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे, ज्योती बावनकुळे, नगरसेवक भगवानजी मेंढे, डॉ. प्रीती मानमोडे, डॉ.वणीकर आदी उपस्थित होते.

Advertisement

या शिबिराच्या माध्यमातून पालकमंत्री बावनकुळे यांनी जलसंधारण आणि वृक्षलागवडीचा संदेश उपस्थितांना दिला. या शिबिरात 573 नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली. यापैकी 160 जणांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. 157 जणांनी रक्त तपासून घेतले. दंत तपासणी 157 जणांची करण्यात आली.

Advertisement

यापैकी 43 रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यात आली. जनरल सर्जरी विभागाने 71 जणांची तापसणी केली. 159 नागरिकांनी ईसीजी काढून घेतला. 43 महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली. जनरल मेडिसिन विभागाने 270 जणांची तपासणी केली. स्त्री रोग विभागाने 193 जणांची तपासणी केली. छातीची 108 जणांची तपासणी करण्यात आली. 48 जणांची किडणीची तपासणी करण्यात आली. 163 जणांची हाडांची तपासणी करण्यात आली. रक्तदाबाची 376 जणांची तपासणी, 102 जणांची मेंदूची तपासणी, मुत्ररोगाची 29 जणांची तर मधुमेहाची तपासणी 301 जणांनी करून घेतली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश बोंडे, हर्ष वानखेडे, विकास धारपुडे, प्रितम लोहासारवा, जितेंद्र लोहासारवा, राजेश गोल्हर, सचिन घोडे, कपिल गायधने, विनोद मोरे, सुजित गहरवार, रोहित पंचबुध्दे, शिरपूरकर आदींनी मेहनत घेतली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement