Published On : Fri, May 14th, 2021

मातृसेवा संघाच्या कार्याला समाजाचा अधिक सहभाग मिळावा : ना. गडकरी

Advertisement

100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तचा समारंभ

नागपूर: मातृसेवा संघाचा इतिहास गौरवशाली आहे. महिलांच्या उत्थानासाठी कार्य करणार्‍या या संस्थेच्या कार्याला समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा अधिक सहभाग व प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

मातृ सेवा संघाला आज 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वर्धापन दिनाच्या आभासी कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अरुणा बाबुळकर, महासचिव डॉ. लता देशमुख, कोषाध्यक्ष वासंती देशपांडे व अन्य उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले-
कमलाताई होस्पेट यांनी या संस्थेची स्थापना केली.

महिलांच्या सेवेचा आदर्श त्यांनी प्रस्थापित केला. ज्या काळात महिलांनी पुढे येऊन काम करण्याची संधी नव्हती, त्या काळात कमलाताईंनी महिलांच्या
उत्थानासाठी काम सुरु केले. त्यांचे जीवन प्रेरणादायी होते. आपले संपूर्ण जीवन त्यांनी समाजसेवेसाठी समर्पित केले होते.


मातृसेवा संघाचा इतिहास हा समाजसेवेचा इतिहास आहे. विदर्भातील तालुकास्थानी मातृसेवा संघाचे कार्य पोहोचले आहे. हा इतिहास सर्वांना माहिती व्हावा म्हणून डॉ. वैशाली बेझलवार यांनी एका पुस्तकाच्या माध्यमातून हा इतिहास सर्वांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- मातृ
सेवा संघाचे हे कार्य अधिक वाढावे, महिलांची जास्तीत जास्त सेवा करता येईल यासाठी डॉ. लता देशमुख व डॉ. अरुणा बाभुळकर यांचे प्रयत्न आहेत.

आगामी काळात या कार्याचे भव्य स्वरूप पाहायला मिळेल.आता नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. याचा उपयोग करून मातृसेवा संघाने आपली एक वेबसाईट तयारकरून या कार्याची माहिती जनतेसमोर जावी यादृष्टीने विचार करावा व नवीन माध्यमांच्या साह्याने समाजापर्यंत पोहोचावे, असेही ना. गडकरी म्हणाले.