Published On : Tue, May 29th, 2018

मिहिका ढोक, आशना चोप्रा विदर्भात ‘टॉप’

Ashna Chopra and Mihika Dhok

Ashna Chopra and Mihika Dhok (98.60%)

नागपूर: ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यात उपराजधानीतील ‘नारायणा विद्यालयम्’ची विद्यार्थिनी मिहिका ढोक व सेंटर पॉईन्ट स्कूल (दाभा) येथील आशना चोप्रा यांनी संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दोघींनाही प्रत्येकी ९८.६ टक्के गुण मिळाले. ‘टॉपर्स’मध्ये बहुतांश प्रमाणात विद्यार्थिनीच आहेत हे विशेष.

‘सीबीएसई’तर्फे ५ मार्च ते ४ एप्रिल २०१८ या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मंगळवारी दुपारी ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला. नागपुरातून ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सुमारे १० हजार विद्यार्थी बसले होते. हिंगणा मार्ग येथील सेंट झेव्हिअर्स स्कूलची विद्यार्थिनी प्रेरणा अग्रवाल हिने ९८.४ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक पटकाविला. तर बी.पी.भवन्स विद्यामंदिरचा (आष्टी) विद्यार्थी यश काळे, सेंट व्हिन्सेंन्ट पलोटी स्कूलची विद्यार्थिनी प्रिया सुथार, सेंटर पॉईन्ट स्कूल (काटोल मार्ग) येतील अरुणव भौमिक व दिशिता सिबल हे प्रत्येकी ९८.२ टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांकावर राहिले.

Prerna Agrawal

Prerna Agrawal (98.4)

 

Advertisement
Arunav Bhowmik and Dishita Sibal (98.2)

Arunav Bhowmik and Dishita Sibal (98.2)

 

Yash Kale (98.2) with Family

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement