मुंबई : मुंबई रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अत्यंत गंभीर आहे.
पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्टयुती सरकारने, चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्रे असल्याने मुंबई व महाराष्ट्रातील जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. मुंबईत झालेला पाऊस हा काही पहिल्यांदाच झालेला नाही.
यापेक्षा मोठा पाऊस मुंबईत झालेला आहे पण आजच्या सारखी बिकट परिस्थिती झाली नव्हती. राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आज मुंबईतील जनतेला या समस्येला तोंड द्यावे लागले नसते, असे पटोले म्हणाले.