Published On : Thu, May 25th, 2023

बारावीत यंदाही मुलींचीच बाजी ; विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२ वी चा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षाच्या निकालात ही मुलींची बाजी मारली असून विद्यार्थिनींचा एकूण निकाल93.73 टक्के तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 89.14 टक्के इतका लागला आहे.

विज्ञान शाखेचा राज्याचा 96.09 टक्के सर्वाधिक इतका निकाल लागला असून कला शाखेचा राज्याचा निकाल 84.05 टक्के इतका तर वाणिज्य विभागाचा निकाल 84.05 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यात यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे
विभागनिहाय निकालाची टक्केवारी –

पुणे ९३.३४ टक्के
नागपूर ९०.३५
औरंगाबाद ९१.८५
मुंबई ८८.१३
कोल्हापूर ९३.२८
अमरावती ९२.७५
नाशिक. ९१.६६
लातूर. ९०.३७
कोकण ९६.०१