नागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील संविधान चौक येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.
जयंतीदरम्यान मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता नागपूर पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसेच परिमंडळ क्रमांक दोनचे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी स्वतः संविधान चौक येथे उपस्थित राहून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.
या बंदोबस्तात मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला. कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews...
गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi...
मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan...
शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews





