Published On : Mon, Nov 5th, 2018

रामटेक येथे श्रीमद भागवत कथेत कृष्णजन्म उत्सव उत्साहात संपन्न

रामटेक : रामटेक येथे श्रीराम यज्ञ समितीच्या वतीने अष्टोत्त्तर शत भागवत ज्ञान यज्ञ कथा सुरू आहे. भागवताचार्य श्रद्धेय नंदकिशोरजी पांडेय यांच्या अमृतमयी ओजस्वी वाणीतून कार्तिक मासाच्या शुभ पर्वावर भागवतकथा सुरू आहे. रामटेक कर नागरिक त कथेला दुपारी 2 पासून तर रात्री 7 पर्यत भक्तीचा भावभक्तीने व श्रद्धेने परमानंद घेतात.भागवत कथेतून भक्तीचा आनंद घेत असतांनाच जीवनाच्या कल्याणासाठी ईश्वरी भक्तीत जीवन व्यतीत करा.संसारसागरात ,सृष्टीत मनुष्यजीवन सर्वश्रेष्ठ आहे.पण त्या मनुष्याने स्वतः साठी तसेच समाज ,राष्ट्र व विश्वाच्या कल्याणासाठी उपयोग झाला पाहिजे असे महत्वपूर्ण विचार कथामांचावरून मांडले. कृष्णाजन्माचा उत्सव नंदोत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.

यावेळी भक्तांनी शुभेच्छा दिल्या वमाखन मिश्रिचा प्रसाद वितरीत करण्यात आला.कृष्णजन्माचा भक्तांनी मनमुराद आनंद घेतला. कृष्णभक्तीत रमलेल्या भाविकांनी नृत्य करून पुष्पवर्षाव करून आनंद द्विगुणित केला. भगवान श्रीकृष्णाच्या रूप ,ऐश्वर्य व गुण सौंदर्य यांचे रसमयी वर्णन करतांना मराठी भजन “किती सांगू मी सांगू कुणाला” या नन्दउत्सवाच्या वेळच्या भजनातून संपूर्ण कथामंडप व परिसर कृष्णभक्तीने दुमदुमून गेला होता.

दररोज पुराणातील वेगवेगळ्या कथांनी श्रद्धाळू आणि भक्तगण न्हाऊन निघत आहेत.भगवान श्रीकृष्ण यांच्या गोकुळ नगरीतील सर्व लीला कथाव्यास श्री नंदकिशोरजी पांडेय महाराज यांनी उलगडून दाखविल्या .सध्या अष्टोत्त्तर शत श्रीमद भागवत कथेमुळे रामटेक नगरीतील वातावरण भक्तीमय व प्रसन्न झालेले असून नेहरू ग्राउंडवर मोठया प्रमाणावर भाविक भक्त श्रीमद भागवत कथेचा लाभ घेत आहे.