Published On : Thu, Mar 19th, 2020

80 लिटर मोहादारु सह एक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात

नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऍक्टिव्हा मोटर सायकल सह 80 लिटर मोहादारु सह 59,420/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना अवैद्य दारु वर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार आज केळवद पोलीस स्टेशन हद्दीत तिडंगी ते उमरी रोड वर उमरी तालुका सावनेर येथे गस्त दरम्यान दुचाकी वरुन होत असलेली अवैद्य मोहा दारु वाहतूक मिळून आली.

यात आरोपी गोपाल मधुकर पाथरकर राहणार खापा तालुका सावनेर यास ऍक्टिव्हा मोटर सायकल एम एच 40 बी व्ही 5732 सह ताब्यात घेतले. यात 80 लिटर मोहा दारु मिळून आली आहे. सदरची कारवाई निरीक्षक मुरलीधर कोडापे यांनी केली व या मोहिमेत जवान मिलिंद गायगवळी व सुभाष शिंदे या कर्मचारयांनी सहभाग घेतला.