Published On : Fri, Oct 2nd, 2020

विभागीय आयुक्त कार्यालयात

महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

नागपूर : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी हरीष भामरे, उपायुक्त चंद्रकांत पराते, तहसिलदार अरविंद सेलोकर आदींनी यावेळी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, श्रीमती बनकर आदींनी यावेळी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.