Published On : Wed, Jun 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नाशिकमध्ये ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Advertisement

नाशिक: नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये मोठी उलथापालथ घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही घोषणा नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली,

सुधाकर बडगुजर यांनी संघटनात्मक बदलांवर नाराजी व्यक्त केली होती आणि पक्षविरोधी कारवायांची गंभीर आरोप केली होती. त्यांच्या या वागणुकीमुळे पक्षशिस्तीचा उल्लंघन झाल्याचे पक्षनेत्यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांच्या फोननंतरच बडगुजर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सुधाकर बडगुजर यांना पक्षातून हकालपट्टी केल्याने ठाकरे गटाच्या स्थानिक संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

या घटनेमुळे नाशिकमधील ठाकरे गटात अंतर्गत मतभेद उघड झाले असून, स्थानिक राजकारणावर याचा मोठा प्रभाव पडू शकतो. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या उलथापालथीचे राजकीय पडसाद उमठू शकतात.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.