Published On : Thu, Jun 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरीरात तहसील भागात तरुणावर चाकूहल्ल्यासह लोखंडी रॉडने मारहाण; क्राइम ब्रँचनं दोन तासांत तिघांना अटक

- जखमी तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू
Advertisement

नागपूर – शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय तरुणावर चाकू व लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, क्राइम ब्रँच युनिट ०३ ने अवघ्या दोन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

घटना कशी घडली?
फर्यादी यशवंत नंदनवार हे काही दिवसांपूर्वी आपल्या मामा राकेश गणेश हेडाऊ यांच्यासोबत पाचपावलीतील महादेव मंदिरात गेले होते. तिथे आरोपी प्रेम उर्फ खंड्या छोटूलाल कुंभारे याने त्यांची गाडी अडवून गाडी हळू चालवा, अन्यथा ‘पाहून घेईन’ अशी धमकी दिली होती.

हल्ल्याचा थरार:
९ जून रोजी रात्री यशवंत आपल्या मित्रांसोबत नंगापुतळा चौकाजवळ पाणीपुरी खाण्यास गेला असताना आरोपी प्रेम कुंभारे, जय दिलीप गांधी व सक्षम क्षीरसागर तांबे हे तिघे दुचाकीवर आले. त्यांनी यशवंतला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रेम कुंभारेने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र यशवंतने चपळाईने चुकवले. तेवढ्यात सक्षम क्षीरसागर तांबेने लोखंडी रॉडने यशवंतच्या डोक्यावर व पायावर जबर मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

पोलीसांची तत्पर कारवाई:
हल्ल्यानंतर तिघे आरोपी पळून गेले. दरम्यान, यशवंतला तत्काळ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच क्राइम ब्रँच युनिट ०३ चे अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय झाले. त्यांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींचा शोध घेतला. फक्त दोन तासांतच पाचपावली परिसरातून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील पोलिसांच्या हवाली केलं.सध्या या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करत असून, हल्ल्यामागील नेमकं कारण काय, हे शोधण्याचे काम सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.