Published On : Mon, Apr 13th, 2020

प्रभाग क्र. ३ आणि ७ चा बहुतांश परिसर सील

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने निर्णय

नागपूर: नागपूर महानगरपालिका हद्दीतील आशीनगर झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ३ आणि सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ७ मधील बहुतांश परिसर कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार आशीनगर झोन क्रमांक ९ आणि सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३ आणि ७ च्या उत्तर पश्चिमेस इटाभट्टी चौक रिंग रोड, उत्तरेस पिवळी नदी वनदेवी नगर, पूर्वेस कळमना गेट क्र. १ कोराडी लाईन, दक्षिण-पश्चिमेस कावरापेठ शांतीनगर रेल्वेगेट, पश्चिमेस कांजीहाऊस चौक बिनाकी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.