Published On : Wed, Oct 6th, 2021

नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुकीत

काँग्रेसचा झेंडा…… भाजपाचे पानीपत

नागपूर: नागपूर जिल्हयातील पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुकीत नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री, मा.श्री. राजेंद्र मुळक, मा.ना.श्री सुनिलजी केदार, मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण, मा.सौ. रश्मी बर्वे, अध्यक्षा, जिल्हा परिषद नागपूर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार विजयी झाले.

या निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभूत झाला. भाजपाचा धुवा उडवित काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीत सर्वाधीक जिल्हा परिषदेच्या ९ जागा व पंचायत समितीचे २१ जागा जिंकल्या अतिशय प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत सत्तेची चाबी शेवटी काँग्रेसच्या हाती गेली.

माजी मंत्री, मा.श्री. राजेंद्र मुळक, मा.ना.श्री सुनिलजी केदार, मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण, मा.सौ. रश्मी बर्वे, अध्यक्षा, जिल्हा परिषद नागपूर हे कार्यकरत्यांच्या या निवडणुकीकरीता तळ ठोकुन बसले होतो. जबरदस्त प्रचार सभा व रॅलीचे आयोजन काँग्रेस पक्षाने केले होते.

मा.आ.श्री. नाना पटोले, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा.ना.श्री नितीनजी राऊत, मंत्री ऊर्जा तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा, मा.आ.श्री. राजू पारवे, मा.आ.श्री. अभिजीत वंजारी, मा.श्री. नाना गावन्डे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा.श्री. किशोर गजभिये, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सभेमुळे निवडणुकीचे वातावरण तयार झाले होते. यशस्वी नियोजन व आखणी करून अभ्यास पूर्ण पद्धतीने कार्यकर्त्यांशी सागळ घालून नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मा.श्री. राजेंद्र मुळक यांनी काँग्रेसचे उमेदवार विजयी केले तसेच जनतेचे आभार मानले.