Published On : Wed, Jul 17th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात चालत्या कारमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे; व्हिडीओ तुफान व्हायरल

पोलिसांनी केला गुन्हा दाखल
Advertisement

नागपूर : शहरात चालत्या कारमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या तरुण आणि तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.मंगळवारी हा व्हिडीओ सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. मुलगा व मुलीवर गुन्हा दाखल करण्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.

ही घटना अमरावती रोडवर गिरीपेठ ते लॉ कॉलेज दरम्यान घडली. सूरज राजकुमार सोनी (वय 28, रा. मानकापूर) असे तरुणाचे नाव आहे. त्याने चार्टर्ड अकाउंटंट म्हणून शिक्षण पूर्ण केले आहे. त्याची मैत्रीण मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे.

Gold Rate
Apr 272026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,200 /-
Gold 22 KT ₹ 1,42,500 /-
Silver/Kg ₹ 2,48,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सूरज हा त्याच्या वडिलांची कार (क्र. MH31-FA6506) घेऊन घरून निघाला. सायंकाळी 7 वाजता तो त्यांच्या गर्लफ्रेंडला घेऊन फिरायला निघाला. गिरीपेठ संकुलातून जात असताना दोघेही कारमध्ये आक्षेपार्ह कृत्य करत होते. तेथून जाणाऱ्या तरुणांनी त्याचा व्हिडिओ काढला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला जो झपाट्याने व्हायरल झाला. याबाबत सीताबर्डी पोलिसांना माहिती मिळाली. वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी सूरज आणि त्याच्या मैत्रिणीसह कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावले. चौकशीनंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, जामीनपात्र प्रकरण असल्याने दोघांनाही नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement