Published On : Mon, Apr 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्रेमीयुगलाची लूट; वाठोड्यात गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहारात तोतया पोलिसांकडून प्रेमीयुगलांना लुटण्याच्या घटना समोर आल्या.आता याप्रकारची घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. एका प्रेमी युगुलाला दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी लुटून युवकाकडून सोनसाखळी हिसकाविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र प्रेमीयुगलाला लुटणारे हे पोलीस कर्मचारी तोतया नसून दोन्ही कर्मचारी कळमना ठाण्यात काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.संदीप यादव आणि पंकज यादव (दोन्ही, रा. कळमना) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कळमना ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून काम करतात.

माहितीनुसार, १३ मार्चला रात्री नऊ वाजताच्या सुमारास १९ वर्षीय युवक हा वाठोडा पोलिस ठाणे हद्दीत, जबलपूर हायवे रोडवरील एफ.एल.डी हॉटेल समोर कारमध्ये बसून त्याच्या मैत्रिणीसह गप्पा मारत होता. संदीप आणि पंकज यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना आम्ही पोलिस आहोत असे सांगून धमकविण्यास सुरवात केली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पोलिसांनी तरुणाला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतची धमकीही दिली.या धमकीला घाबरत युवकाने गळ्यातील सोनसाखळी काढून पोलिसांना दिली. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता न करण्यास ठणकावले.घडलेल्या घटनेवरून युवकाने वाठोडा पोलिस ठाणे गाठले. तसेच तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी ३९२ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. युवकाला लुटणारे ते दोघेही कळमना पोलिस ठाण्यात कर्मचारी असल्याची माहिती समोर आली.याप्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

Advertisement

गेल्या अनेक दिवसांपासून पंकज व संदीप यादव हे दोघे रिंगरोडवर प्रेमीयुगुलांना लुटत होते. मात्र आता असे काही प्रकार घडल्यास .पीडितांनी नि पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे कार्यालयीन वेळेत थेट तक्रार करावी, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.