Published On : Thu, May 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात यंदा कडक नवतपा ; उष्णतेच्या झळांनी नागरिकांची लाहीलाही

Advertisement

नागपूर : गेल्या आठवड्याभरापासून नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. यातच नवतापालाही सुरुवात झाली असून उष्णतेच्या झळांनी नागरिकांची लाहीलाही होत आहे. यंदा नागरिकांना कडक नवतपाला तोंड द्यावे लागेल आंतरराष्ट्रीय ज्योतिषी डॉ. अनिल वैद्य यांनीही यासंदर्भात अंदाज वर्तविला.

सूर्य येत्या गुरुवारी रात्री ८.५६ वाजता रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्या वेळेपासून नवतपाला सुरुवात होईल. नवतपा हा नऊ रात्रीचा काळ असून या काळात सूर्य पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. त्यामुळे संपूर्ण भारतासह इतर देशांमध्येही वातावरणातील उष्णता वाढते. यावर्षी देशाच्या विविध भागामध्ये चक्रीवादळ आले. तसेच, अनेक ठिकाणी वारंवार पाऊस येत आहे. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे नागपुरातील वातावरणात दमटपणा अनुभवायला मिळाला.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परिणामी, या नवतपामध्ये नागपुरातील तापमान वाढून ४६ डिग्री सेल्शिअसच्यावर जाण्याची शक्यता आहे. नवतपा काळात सकाळी ५.४४ वाजता सूर्योदय तर, सायंकाळी ६.५४ वाजता सूर्यास्त होईल. दिवसाचा कालावधी १३ तासांपेक्षा जास्त होणार असून उष्णतेचे प्रमाणही वाढेल. २ जून रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर नवतपा संपेल. तर मान्सूनला सुरुवात होईल, अशी माहिती वैद्य यांनी दिली.

Advertisement
Advertisement