नागपूर : अंबाझरी गार्डनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह पाडल्याप्रकरणी नागपुरातील आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी गरूडा कंपनीचे मालक नरेंद्र जिचकार हे गुन्हेगार असल्याचा आरोप केला आहे.
जिचकार यांनी यश गोरखेडे यांना अंबाझरी गार्डन पुन्हा मिळवून देण्यासाठी आंबेडकर सांस्कृतिक सभागृह पाडल्याचा आरोप ‘आप’ने केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जिचकार यांना त्यांच्या कृत्याबद्दल कधीही माफ करणार नाहीत,असे पक्षाने म्हटले आहे. शिवाय, AAP ने नागपूर महानगरपालिकेत (NMC) जिचकार आणि त्यांच्या पत्नीच्या कथित घोटाळ्यांचा पर्दाफाश केला.
एका प्रसिद्धीपत्रकात आम आदमी पक्षाने नागपूर महानगरपालिकेत (NMC) होत असलेल्या अनेक घोटाळ्यांवर प्रकाश टाकला.
• गटारीवरील झाकणे निकृष्ट दर्जाची : पक्षाने दावा केला की संपूर्ण नागपूर शहरातील गटरांवरील सिमेंटची झाकण निकृष्ट दर्जाचे आहेत. ही झाकणे आता अनेक ठिकाणी तुटली असून, महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही जबाबदार ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाडणे: AAP ने विशेषत: अंबाझरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाडल्याचा आरोप गरुडा कंपनीचे मालक नरेंद्र पुरुषोत्तम जिचकार यांच्यावर केला. याशिवाय, जिचकार यांच्या पत्नी डॉ. शिल्पा जिचकार या सध्या एनएमसीमध्ये सिटी टीबी अधिकारी म्हणून काम करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 59 नुसार, जर नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या जोडीदाराच्या महानगरपालिकेच्या कोणत्याही कंत्राटामध्ये हिस्सा किंवा स्वारस्य असेल, तर संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ केल्या जाईल, सर्व नियम व अटी माहीत असून सुद्धा नागपूर महानगरपालिका द्वारे अंजनी कृपा लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड चे मालक नरेंद्र पुरुषोत्तम जिचकार यांना मनपाद्वारे मागील 12 वर्षात 60 कोटी रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे.
नरेंद्र जिचकार यांचा संचालक ओळख क्रमांक (DIN) 03045544 आहे, अंजनीकुपा लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड ओळख क्रमांक (CIN) U74999MH2016PTC285282 आहे, इतके सर्वे पुराने असून सुद्धा महानगरपालिकेमध्ये मागील अनेक वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेच्या कृपेने खड्डे दुरुस्तीचे कंत्राट जेट पॅचर मशीनद्वारे अंजनी कृपा लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड ला देण्यात येत आहे, संबंधित दोषींवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा नागपूर महानगरपालिका विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.