Published On : Sat, Jan 4th, 2020

नागपूर विभागात २१ महिला करतात सेवेचे संचालन

नागपूर: विमानात मोजकेच प्रवासी असतात. परंतु रेल्वे गाडीत हजारांच्या वर प्रवाशांची संख्या असते. त्यांना नियोजित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी लोकोपायलट अर्थात चालकाची असते. कधी काळी ही जबाबदारी पुरूषच सांभाळायचे. कालांतराने या क्षेत्रातही महिलांना संधी देण्यात आली. नुरूल शफूर असे त्या यशस्वी चालक महिलेचे नाव आहे. त्या मेल आणि एक्स्प्रेसची चालक असून शेकडो प्रवाशांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यावर ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून यशस्वीपणे ती सांभाळत आहे.

मध्य रेल्वे नागपूर विभागात लोकोपायलट, सहायक, शंटिग चालक आणि गार्ड्स अशा एकून २१ महिला कर्मचारी आहेत. इलेक्ट्रीक आणि ऑपरेqटग विभागात १९९२ पासून महिलांची भरती झाली. योग्य प्रशिक्षणानंतर त्यांना गाडी चालिण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. सध्या मेल/एक्स्प्रेस चालक – १, सहायक चालक -५, वरिष्ठ सहायक चालक -७, गार्ड्स -४, गुड्स चालक -२ आणि शंqटगसाठी दोन कर्मचारी आहेत.

चालकांना आधी शंटिगचे काम दिले जाते. शंटिग अर्थात रेल्वे स्थानकावर आलेल्या गाड्यांना यार्डात पोहोचविने. मुख्य रूळावरून स्टेशनमध्ये सुरक्षित असलेले ठिकाण म्हणजे यार्ड. याठीकानी रेल्वेगाडी पोहोचविण्याचे काम दोन महिला कर्मचारी करीत आहेत. त्याच प्रमाणे मालगाडी चालविण्यासाठी दोन महिला आणि दोन महिला गार्ड्स आहेत. नागपूर ते आमला पर्यंत गाडी घेवून गेल्यानंतर रात्रीचा प्रवास महिला गार्ड्ला दिल्या जात नाही.

त्यामुळे आमल्यावरूनच त्या नागपुरला परततात. यासोबतच सहायक चालक -५, वरिष्ठ सहायक चालकांची संख्या -७ आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांना दिलेली जबाबदारी योग्यरित्या सांभाळीत आहेत. भारतीय रेल्वेत महिला चालकांची संख्या वाढत आहे. सध्या महिलांवर मालगाडीची जबाबदारी असली तरी येणाèया काळात मेल/एक्स्प्रेसची जबाबदारी बèयाच प्रमाणात महिलांकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणतीही जबाबदारी कुशलतेने पार पाडण्याचे निसर्गदत्त कौशल्य महिलांकडे आहे. हिच बाब लक्षात घेऊन पुरुषी मानल्या जाणाèया पदांवरही महिलांची नियुक्ती करण्यात आली. सैन्यातही फायटरपायलटसह अन्य महत्त्वपूर्ण पदांवर महिलांची नियुक्ती केली गेली. यासर्वच महिला अधिकाèयांनी त्यांची कर्तबगारी सिद्ध केली आहे. रेल्वे सेवेतही रेल्वेगाड्यांच्या संचालनात पूर्वी पुरुषांचेच वर्चस्व होते, काही अंशी ते आजही आहे. पण, महिलांकडे जबाबदारी येताच त्यांनी अधिक सक्षमतेने जबाबदारी पार पाडली. आपत्कालिन परिस्थितीत अधिक कौशल्य, प्रसंगावधान राखून हजारो प्रवाशांचे प्राण वाचविण्याची किमया या रेल्वे संचालनात कार्यरत महिलांनी करून दाखविली आहे.