Published On : Tue, Sep 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात प्रेमसंबंधातून अल्पवयीन युवती गर्भवती ; आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : शहरात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. यात अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. नुकतीच वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घटना घडली. मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, मैत्रीण गर्भवती झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या मित्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

वाठोडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हरिश्चंद्र देशभ्रतार (२४, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याची एका १७ वर्षीय मुलीशी मैत्री होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.मे महिन्यात तिच्या घरी कुणीच नसल्याचा फायदा उचलत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर अनेकदा त्याने तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांअगोदर मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्या. तिच्या पालकांनी तिला मेडिकल रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याची बाब समोर आली. पालकांनी विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी केलेली तक्रार व वैद्यकीय सूचनेवरून वाठोडा पोलीस ठाण्यात आरोपी सिद्धार्थविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटकही करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.