Advertisement
नागपूर : होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च रोजी आपली बस सेवा न चालवण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या पदरी निराशा आली.
तसेच याच दिवशी दुपारी 3 वाजतापर्यंत मेट्रो सेवा देखील उपलब्ध होणार नाही, असे अहवालात म्हटले आहे, तरीही यावर अंतिम निर्णय घेणे बाकी आहे.
24 मार्चच्या संध्याकाळी 7 वाजल्यापासून आपली बस सेवा बंद करेल. 26 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून बससेवा पुन्हा सुरू होईल, असे एनएमसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, होळीसाठी मेट्रोच्या वेळेत बदल करण्याच्या निर्णयासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.