Published On : Tue, Apr 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पतीने दगडाने ठेचून केला पत्नीचा खून ; पोलिसांकडून अटक

Advertisement

नागपूर : बेलतरोडी परिसरात पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. साईजाबाई बाबाराव नागपुरे असे मृत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी आरोपी पती बाबाराव नागपुरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. नागपूर टुडेशी बोलताना पोलीस उपायुक्त (डीसीपी) झोन ४ विजयकांत सागर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

साईजाबाई यांचा पती बाबाराव याने मंगळवारी दगडाने ठेचून खून केला. तपास प्राथमिक टप्प्यावर आहे. आम्ही आरोपी पतीला अटक केली आहे. मात्र, गुन्ह्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे डीसीपी म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , साईजाबाई आणि बाबाराव यांचा मालमत्तेवरून वाद सुरू होता. त्यामुळे बाबाराव याने पत्नीचा खून केला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.