Published On : Wed, Jul 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले ,नागरिकांची तारांबळ; मनपाचे अधिकारी मात्र गाढ झोपेत !

Advertisement

नागपूर : शहरात जरी सतत पाऊस पडत नसला तरी अधून -मधून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. पावसाने शहरावर पाणी साचून कहर केला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र शहरात या सर्व समस्या सुरु असताना महापालिकेचे अधिकारी गाढ झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. सार्वजनिक तक्रारींवर कारवाई आणि प्रतिसादाचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अधिका-यांनी जलदगतीने कार्य करणे, जनतेशी संवाद साधणे आणि पाणी साचण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हालचाली सुरु करणे गरजेचे आहे.

शहरातील मुख्य रस्ते आणि सखल भाग पावसाच्या पाण्याने तुंबले गेले आहे. गटार, स्ट्रॉम वॉटर पाईप्स आणि नाले देखील भरले आहे. या परिस्थितीमुळे काही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर रस्त्यांच्या कडेला उभी केलेली वाहने साचलेल्या पाण्यात अंशत: किंवा पूर्णतः बुडाली आहेत.

शहारत निर्माण झालेल्या या परिस्थितीला जबाबदार कोण? महापालिकेचे अधिकारी कुठे आहेत? लोकांच्या तक्रारीला प्रतिसाद का देत नाहीत, अशा अनेक सवालांची सरबत्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरकरांनी उपस्थित केली.

दरम्यान परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, नागपुरातील पाणी तुंबण्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने त्वरीत पावले उचलणे अत्यावश्यक आहे. रहिवाशांचा त्रास आणि गैरसोय टाळण्यासाठी तुंबलेले नाले साफ करण्याची गरज आहे. नागपूर : शहरात जरी सतत पाऊस पडत नसला तरी अधून -मधून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. पावसाने शहरावर पाणी साचून कहर केला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र शहरात या सर्व समस्या सुरु असताना महापालिकेचे अधिकारी गाढ झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. सार्वजनिक तक्रारींवर कारवाई आणि प्रतिसादाचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अधिका-यांनी जलदगतीने कार्य करणे, जनतेशी संवाद साधणे आणि पाणी साचण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हालचाली सुरु करणे गरजेचे आहे.

Advertisement

शहरातील मुख्य रस्ते आणि सखल भाग पावसाच्या पाण्याने तुंबले गेले आहे. गटार, स्ट्रॉम वॉटर पाईप्स आणि नाले देखील भरले आहे. या परिस्थितीमुळे काही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर रस्त्यांच्या कडेला उभी केलेली वाहने साचलेल्या पाण्यात अंशत: किंवा पूर्णतः बुडाली आहेत.

शहारत निर्माण झालेल्या या परिस्थितीला जबाबदार कोण? महापालिकेचे अधिकारी कुठे आहेत? लोकांच्या तक्रारीला प्रतिसाद का देत नाहीत, अशा अनेक सवालांची सरबत्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरकरांनी उपस्थित केली.

दरम्यान परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, नागपुरातील पाणी तुंबण्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने त्वरीत पावले उचलणे अत्यावश्यक आहे. रहिवाशांचा त्रास आणि गैरसोय टाळण्यासाठी तुंबलेले नाले साफ करण्याची गरज आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.