नागपूर :विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरविण्यास सुरुवात केली आहे. आज काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर नागपूरसह विधानसभेचे जवळपास सर्वच उमेदवार जाहीर झाले. शिवाय ज्या जागेवरून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात वाद झाला होता त्या नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील उमेदवारीचीही काँग्रेसने घोषणा केली आहे.नागपुरात काँग्रेसने जनतेच्या मनात घर करणाऱ्या नेत्यांना दिली संधी दिल्याचे दिसते. यातील दोन नावांची सातत्याने चर्चा होत आहे ती म्हणजे दक्षिण नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव आणि नागपूर मध्य मतदारसंघातून बंटी शेळके आहेत.
बंटी शेळके यांची काँग्रेसच्या तळागाळातील नेते म्हणून ओळख-
भारतीय युवक काँग्रेसमध्ये सरचिटणीस म्हणून चोख भूमिका बजावणारे बंटी शेळके यांची काँग्रेसच्या तळागाळातील नेते म्हणून ओळख आहे. जनतेच्या हितासाठी लढण्याचा वारसा वडिलांकडून मिळालेला वारसा पुढे नेत व पुढे राजकारणात प्रवेश करून युवक काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता ते संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अशी वाटचाल करणारे काँग्रेस नेते बंटी शेळके पक्षाचे नागपुरातील तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
बंटी शेळके यांचे सरकारविरोधातील अनेक आंदोलन चर्चेत –
जकारणात आल्याशिवाय संघर्षाला धार येणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने सुरू केली. प्रथम त्यांनी प्रभागातील समस्यांचे मुद्दे हाती घेतले. २०१७ मध्ये त्यांनी प्रथम महापालिका निवडणूक लढवली व भाजपचा बालेकिल्ला असलेल्या महाल भागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले. एक संघर्षशील नगरसेवक अशी त्यांची सभागृहात प्रतिमा होती. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना सरकार विरोधात अनेक आंदोलने केली. त्यामुळे ते घराघरात पोहोचले.अनेकदा तुरुंगवासही भोगला.
नागपूर महानगर पालिकेसह सत्ताधाऱ्यांना वारंवार धरले धारेवर –
कोरोना साथीने थैमान घातले असताना लोकांच्या मदतकार्यात स्वत:ला झोकून दिले. या काळात स्वत:च्या पाठीवर फवारणी यंत्र ठेवून प्रभागात घरोघरी जाऊन कीटकनाशकाची फवारणी केली, महापालिका नाले सफाई करीत नसल्याने बंटी शेळके यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. हे सर्व कामे करत बंटी शेळके यांनी नागपूरकरांच्या मनात घर केले.
दक्षिण नागपुरातील जनतेचे प्रश्न उचलून धरण्यासाठी गिरीश पांडव अग्रस्थानी –
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत दक्षिण नागपूर येथून गिरीश पांडव यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.येथून महा विकास आघाडीतील उबाठा पक्ष निवडणूक लढविण्यास आग्रही होता. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात याच जागेवरून खटके उडाले होते. अखेर ती जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली आहे. दक्षिण नागपुरातून काँग्रेसने गिरीश पांडव त्यांच्या रूपाने प्रबळ शिलेदार मैदनात उतरविला आहे. पांडव वारंवार दक्षिण नागपुरातील जनतेचे प्रश्न उचलून धरले. स्थानिक नागरिकांना कोणत्याही अडचणी आल्या की पांडव हे धावून जातात. तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पांडव यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात अनेक आंदोलने केली. त्यामुळे जनतेचा विश्वास जिंकण्यात त्यांना मोठे यश आला आहे.
भाजपच्या मोहन मते यांना देणार टक्कर –
गिरीश पांडव यांनी गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या नाकी नऊ आणले होते. मोहन मते यांना त्यांनी चांगलीच टक्कर दिली होती. अवघ्या 4013 मतांनी गिरीश पांडव यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदाही गिरीश पांडव हेच दक्षिणचे उमेदवार म्हणून मैदानात उतरणार असून ते भाजपच्या मोहन मते यांना टक्कर देणार आहे.