Published On : Thu, Oct 17th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात रेल्वे तिकीट दलालांवर कारवाई; तिघांना अटक

३५ तिकिटांसह संगणक जप्त
Advertisement

नागपूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर तिकीट दलालांना पकडण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत नागपूरसह डोंगरगड आणि छिंदवाडा येथे तीन दलालांना अटक करण्यात आली आहे. तिघांकडून ३५ तिकिटांसह संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या दलालांमध्ये जरीपटका येथील रहिवासी जुगलकिशोर कश्यप, डोंगरगड येथील रहिवासी राजेश कुमार वर्मा आणि कोहमा जिल्ह्यातील छिंदवाडा येथील रहिवासी रुपेश बघेल यांचा समावेश आहे.

जरीपटका येथे केलेल्या कारवाईत जुगल किशोर हा केके कन्सल्टन्सी नावाच्या दुकानाच्या नावाखाली अवैध तिकीट दलालीचे काम करत होता. त्याच्या दुकानावर छापा टाकून वैयक्तिक ओळखपत्रावर बुक केलेली चार तिकिटे जप्त करण्यात आली.

चौकशीत त्याने कमिशनवर रेल्वे तिकीट बुक केल्याची कबुली दिली.तसेच डोंगरगड येथील राजेशकडून १५ जुनी तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय छिंदवाडा येथील रहिवासी रुपेशकडून १५ जुनी तिकिटेही सापडली आहेत. या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर रेल्वे कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement