Published On : Tue, Jan 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे विद्यार्थिनीने केली आत्महत्या;स्वतःवर कुऱ्हाडीने केले वार

नागपूर : शहरातील छत्रपती चौक परिसरात ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात अडकलेल्या बारावीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळी ५:४५ च्या सुमारास, विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना ती तिच्या बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दीक्षा ( बदलले नाव ) ही एका नामांकित शाळेची विद्यार्थिनी होती. तिचे वडील रिझर्व्ह बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत.दीक्षाला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागले होते. तपासात असेही आढळून आले की ती वारंवार मृत्यू आणि परदेशी संस्कृतीशी संबंधित माहिती ऑनलाइन शोधत असायची.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोमवार आणि मंगळवार रात्री दीक्षा तिच्या बेडरूममध्ये होती. पोलिसांनी सांगितले की,तिने प्रथम हाताच्या नासा कापल्या नंतर धारदार लोखंडी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून आत्महत्या केली. सकाळी जेव्हा दीक्षाची आई तिच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिला रक्ताच्या थारोळ्यात पाहून तिला धक्काच बसला. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून दीक्षाचे वडीलही खोलीत पोहोचले आणि त्यांनी हे हृदयद्रावक दृश्य पाहिले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वाखाली धंतोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांना दीक्षाच्या हातावर पाच खोल जखमा आढळल्या, त्यापैकी दोन क्रॉस मार्क्स होत्या. मानेवरही धारदार शस्त्राचे निशाण होते.

सुरुवातीच्या तपासात, पोलिसांना संशय आहे की ती एखाद्या ऑनलाइन गेमचा भाग होती. ज्यामध्ये आत्महत्या करण्यासाठी खास डिझाइन केलेल्या शस्त्रांचा वापर केला जातो.याप्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement