Published On : Mon, Aug 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या सिव्हील लाईन्स येथील बंगल्यात निघाला साप

नागपूर: उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या सिव्हील लाईन्स येथील बंगल्यात साप निघाल्याने खळबळ उडाली आहे. रविवार दिनाक 18 ऑगस्टला सायंकाळी सात वाजता पोलीस हवालदार यांना हा साप दिसला. याबाबतची माहिती पोलीस कंट्रोल रूम येथे फोन करून देण्यात आली. त्यांनतर पोलिसांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना फोन करून सांगितले. शुभम आणि सागर सावले हे दोन्ही सर्पमित्र 10 मिनिटात सीव्हील लाइन्स येथे हायकोर्ट बंगला येथे दाखल झाले. त्यांनतर त्यांनी सापाचा शोध घेतला साप धामण जातीचा 6 फूट लांबीचा होता सापाला सुखरूप बंदिस्त करून जंगलात सोडण्यात आले.

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.