Published On : Sat, Jul 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात विकासाच्या नावावर खेळ मांडला…मुसळधार पावसामुळे पुन्हा शहराचे धिंडवडे उडाले !

Advertisement

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत शनिवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शहराचे धिंडवडे उडाले आहेत. या पावसामुळे पुन्हा एकदा शहारात पूरजन्य परिस्थितीची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र दिसले. शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने रस्ते तुंबले तर रहिवाशी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र प्रशासनाला नागपूरकरांच्या समस्येशी काहीच देणेघेणे नाही.

नागपुरात विकासाच्या नावावर खेळ मांडला –

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरात सकाळपासून विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. नागपुरात गेल्या तीन तासात सरासरी 90 मिलिमीटर पाऊस झाला. अजून 3 तास जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मात्र या पावसामुळे शहरात हाहाकार माजला. यावरून विकासाच्या नावावर नागरिकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सिमेंट रस्त्याच्या कामामुळे उपराजधानीत जागोजागी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक परिसरातील नागरिकांनी रोषही व्यक्त केला.

उंच सिमेंट रस्ते तर ड्रेनेज सिस्टीमचा अभाव –

सिमेंट रोड बनविण्यापूर्वी रस्त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरला आहे. तर अनेक भागात अर्धवट सिमेंट रस्त्यांमुळे अडचणी निर्माण होत आहे. सिमेंट रस्त्याच्या काही भागात ड्रेनेज सिस्टीम आहे, तर काही भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी अशी कुठलीही यंत्रणा नाही. त्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याचे समोर आले. इतकेच नाही तर कमी अधिक प्रमाणात उंच सिमेंट रस्ते, पाण्याचे आऊटलेट नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या. अनेक सखल भागामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

अंबाझरी तलाव परिसरातील वस्त्यांमध्येही शिरले पाणी-

मुसळधार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव पुन्हा ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. या अगोदर 23 सप्टेंबर 2023 मध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे अंबाझरी तलावाचे पाणी विविध वस्त्यांमध्ये शिरून हाहाकार माजला होता. तर यात कोट्यवधीच्या संपत्तीचे नुकसान झाले होते. अंबाझरी तलावालगतचा स्वामी विवेकानंदांचा पुतळा हलवण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी तेथील पुतळ्याच्या बांधकामामुळे अडले व आजूबाजूंच्या वस्तीत शिरले. त्यामुळे हा पुतळा हलवावा, या मागणीने जोर धरला होता. तसेच तलावा लगत बांधकाम सुरु असलेल्या उंच इमारतीमुळेही हीच समस्या निर्माण होणार असल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Advertisement
Advertisement