Published On : Wed, Mar 11th, 2020

होळी, धुळवडीचा बंदोबस्त : नागपुरात २६३१ सीसीटीव्ही कॅमेरांची समाजकंटकांवर नजर

नागपूर : मद्यधुंद वाहनचालकांवर तसेच हुल्लडबाजांवर पोलिसांनी सोमवारी सायंकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली आहे. धुळवडीच्या दिवशी चौकाचौकात पोलीस राहणार असून, उपद्रव करू पाहणाऱ्यांवर, समाजकंटकांवर नजर ठेवण्यासाठी २६३१ सीसीटीव्ही कॅमेरऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे.

पाहणाऱ्यांवर, समाजकंटकांवर नजर ठेवण्यासाठी २६३१ सीसीटीव्ही कॅमेरऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. उपराजधानीत होळी धुळवड शांततेत साजरी व्हावी, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. दारूच्या नशेत वाहन चालवून किंवा निष्काळजीपणे वेगात वाहने चालवून काही उपद्रवी मंडळी अपघात घडवून आणतात. त्यामुळे निर्दोष व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे होऊ नये म्हणून पोलिसांनी उपराजधानीत चोख बंदोबस्त लावला आहे.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोमवारी सायंकाळपासूनच नागपुरात गस्त वाढवण्यात आली असून, ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. आरडाओरड करणारे, दारूच्या नशेत वाहन चालविणारे, ट्रीपल सिट चालणारे, सिग्नल तोडणारे, हेल्मेट न घालता वाहन चालविणारे तसेच वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई आरंभली होती. उपराजधानीच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांची कारवाई बघायला मिळत होती.

मंगळवारी सकाळपासूनच वाहतूक शाखेचे पोलीस ही कारवाई तीव्र करणार असल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी लोकमतला सांगितले. रस्त्यावर उभे असणारे आणि गल्लीबोळात गस्त घालणारे पोलीस हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवणार आहे. मात्र, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावलेल्या उपराजधानीतील २६३१ सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही पोलीस समाजकंटकांवर नजर ठेवणार आहेत.

जबरदस्तीने रंग लावल्यास खबरदार! धुळवडीच्या दिवशी एकमेकांना रंग लावणे स्वाभाविक आहे. मात्र, कोणत्याही महिला-मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध कुणी रंग लावू नये. जबरदस्तीने रंग लावण्याचा अथवा छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला आहे. अशा प्रकारची कोणतीही तक्रार अथवा सूचना मिळाल्यास तातडीने कडक कारवाई करा, असे निर्देशही डॉ. उपाध्याय यांनी ठाणेदारांना दिले आहेत.

Advertisement
Advertisement