Published On : Tue, Apr 28th, 2020

कामठी तालुक्यात पावसाच्या तडाख्याने मांगली येथे घरावरील छत उडाले

तर महालगाव येथे विजेचा करंट लागून म्हशीचा मृत्यू

कामठी: सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास झालेल्या वादळी पावसाने मांगली येथील घरावरील टीनाचे शेड उडाले तर महालगाव येथे म्हशी चा मृत्यू झाल्याची घटना घडली असून दोन्ही घटनेत दोन लाख रुपयांचे शेतकर्याचे नुकसान झाले आहेत

कोरोणाच्या संकटामुळे आधीच ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले असताना सोमवारी सायंकाळी आसमानी संकटाने परत वादळी पावसाला सुरुवात करून तालुक्यातील मांगली येथील भाऊराव रामाजी गडमडे वय 48 याचे घरावरील टिनाचे शेड उडाल्यामुळे घरात पाऊस पाणी साचल्याने अन्नधान्यव जीवनावश्यक वस्तूचे मोठ्याप्रमाणात भिजून वस्तू व शेड मिळून दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असून भाऊराव गडमडे यांचे घरावरील छत उडाल्यामुळे त्यांना शेजारच्या नागरिकांकडे आसरा घ्यावा लागत आहे घटनेचे माहिती तहसीलदार अरविंद हिंगे याना दिली असता त्यांनी पटवारी धर्मरक्षित मुरमाडकर यांना घटना स्थळी पाठवून अहवाल सादर करण्यास सांगितले आहेत दुसरी घटना महालगाव येथील राजू सीताराम मोहरले वय 41 हे सायंकाळी 5, 30 आपल्या शेतात गायी—


म्हशीं चारत असताना वादळी पावसाने विजेचे खांब जमिनीवर पडले जिवंत विद्युत्तारेचा म्हशीला स्पर्श होऊन करंट लागून म्हीश जागीच मरण पावली त्यामुळे राजू मोहरले यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती महसूल विभागाला दिलिअसता पटवारी नितीन उमरेडकर यांनी घटनास्थळी जाऊन अहवाल तहसीलदार अरविंद हिंगे याचे कडे सादर केला आहे दोन्ही शेतकऱ्यानी घटनेची माहिती मौदा पोलिस स्टेशनला दिली असून दोनही शेतकऱ्याना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी व गावकऱ्यानी तहसीलदाराकडे केली आहे

संदीप कांबळे कामठी