| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, May 14th, 2021

  कामठी तालुक्यात रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी

  कामठी:-दरवर्षी कामठी तालुक्यात रमजान ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात तसेच रमजान ईदची विशेष नमाज शहरातील गिरजाघर जवळील ईदगाह तसेच रबबानी मैदान ईदगाह तसेच मशिदीत सामूहिक विशेष नमाज पठण केली जाते मात्र मागील वर्षीप्रमाणे यंदा च्या वर्षीसुद्धा कोरोनाच्या पाश्वरभूमीवर लागू असलेले संचारबंदी व लॉकडाउन मुळे मुस्लिम समाजबांधवांना ईदची नमाज सामुहिक अदा करता आली नसून समस्त मुस्लिम बांधवांनी रमजान ची विशेष नमाज घरातच राहुन अदा केली.तर कोरोनामुळे मुस्लिम बांधवांनो मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा साध्या पद्ध्तीने रमजान ईद साजरी केली.

  मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र असतो मात्र कोरोनामुळे रमजान च्या या पूर्ण महिन्यात मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण केले .मुस्लिम बांधव रमजान ईदच्या दिवशी सामूहिक नमाज पठण करून एकत्र येऊन शुभेच्छा देत असतात मात्र कोरोना मुळे यावर्षीच्या रमजान ईदला मुस्लिम बांधव तसेच धर्मगुरूंनी शासनाने दिलेल्या निर्देश चे कटेकोर पालन करीत सामाजिक भान राखीत ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.तर हा रमजान ईद पर्व योग्यरित्या साजरा व्हावे यासाठी पोलीस उपायुक्त डीसिपी निलोत्पल व एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या नेतृत्वात जागोजागी पोलिस बंदोबस्त लावून प्रत्येक घटनेवर नजरा ठेवून होते.

  बॉक्स:-कापड व रेडिमेड बाजार पेठेला फटका-कोरोनाच्या संकटामुळे पवित्र रमजान महिन्यातील नमाज, रोजे, तराबी,इफ्तार,बडीरात व इतर धार्मिक कार्यक्रम साधेपणाने साजरी करण्याचा संकल्प मुस्लिम समाजातून झाल्याने यंदा लहान मोठे सगळ्या मुस्लिम समाजबांधवांनी नवीन कपडे खरेदी करणे टाळले परिणामी तालुक्यातील रेडिमेड कापड खरेदी मंदावली व कापड बाजार पेठेला फटका बसला तसेच कापड खरेदी सोबत बूट चप्पल बाजारातही खरेदीचा फटका बसला ….

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145