| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Sep 22nd, 2020

  भंडारा जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64 टक्के

  · मृत्यू दर 2.14 टक्के

  · आज बरे झालेले रुग्ण-130

  · आज पॉझिटिव्ह रुग्ण-205

  · आज मृत्यू- 02

  भंडारा : जिल्ह्यात कोविड-१९ या संसर्गजन्य आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 64 टक्के असून मृत्यू दर 2.14 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात आज 130 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 205 पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्याचे प्रमाण पाहता लक्षणे दिसताच तपासणी व योग्य काळजी घेतल्यास कोरोना पासून दूर राहणे सहज शक्य आहे. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2611 तर पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 4101 झाली आहे.

  कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 123, साकोली 17, लाखांदूर 03, तुमसर 20, मोहाडी 22, पवनी 11 व लाखनी तालुक्यातील 09 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 2611 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 4101 झाली असून 1402 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 88 झाली आहे.

  आज 22 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 192 व्यक्ती भरती असून 1885 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145